सोनं, चांदी झाली स्वस्त! वाचा आजचे लेटेस्ट दर

On: May 28, 2026 12:35 PM
Gold Silver Price
---Advertisement---

Today Gold Price | सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी होत होते, मात्र आता चांदीच्या भावातही मोठी घट नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोनं आणि चांदी किती स्वस्त झाली? :

बुधवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 1 लाख 58 हजार 290 रुपयांवर होता. मात्र गुरुवारी त्यामध्ये सुमारे 2 हजार 230 रुपयांची घट झाली असून नवीन दर 1 लाख 56 हजार 60 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. (Today Gold Price)

चांदीच्या किमतीत सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. मुंबईत बुधवारी प्रतिकिलो चांदीचा दर 2 लाख 85 हजार रुपये होता. मात्र गुरुवारी हा दर थेट 10 हजार रुपयांनी कमी होऊन 2 लाख 75 हजार रुपयांवर आला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदीचा (Silver Rate) दर 275 रुपयांवर स्थिरावला आहे. सलग काही दिवस स्थिर असलेल्या चांदीच्या बाजारात अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

Today Gold Price | महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर :

दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि कोलकाता (Kolkata) येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 56 हजार 60 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 43 हजार 50 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 17 हजार 40 रुपये इतका आहे.

चेन्नई (Chennai) मध्ये मात्र सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत थोडे अधिक आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 180 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असून 22 कॅरेट सोने 1 लाख 45 हजार रुपये आणि 18 कॅरेट सोने 1 लाख 21 हजार 600 रुपयांवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिर परिस्थिती, विशेषतः इराण (Iran), इस्राईल (Israel) आणि अमेरिका (United States) यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारावर परिणाम होत असल्याचे मानले जात आहे. या परिस्थितीत सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

News title : Gold Silver Price Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now