Gold Silver Price | 2025 वर्ष गुंतवणूकदारांसाठी सोन्याहून पिवळं ठरलं आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी पाहायला मिळत असून, वर्षभरात त्यांच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सोन्याचे दर 2025 मध्ये तब्बल 52,795 रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीच्या दरात तर थेट 1,00,969 रुपयांची उसळी नोंदवली गेली आहे. (Gold price today)
चांदीचा आजचा दरही मोठ्या वाढीसह समोर आला आहे. 636 रुपयांच्या वाढीनंतर एका किलो चांदीचा दर 1,86,986 रुपये झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,92,595 रुपये इतका झाला आहे. एका वर्षात झालेली 1 लाख रुपयांहून अधिक वाढ चांदी गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा घेऊन आली आहे. (Silver rate 2025)
24 कॅरेट सोन्याने गाठली नवी उंची :
24 कॅरेट सोन्याचा दर आज 747 रुपयांनी वाढून 1,28,535 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. जीएसटीसह हा दर थेट 1,32,391 रुपये झाला आहे. 2025 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली 52,795 रुपयांची वार्षिक वाढ गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा घेऊन आली आहे.
17 ऑक्टोबरला सोन्याने वर्षातील उच्चांक गाठत 1,38,074 रुपये असा दर गाठला होता. त्या तुलनेत आज सोनं 2,339 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 22 कॅरेटच्या सोन्याचा जीएसटीसह दर 1,21,270 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 99,293 रुपये इतका आहे.
Gold Silver Price | कॅरेटनुसार सोन्याच्या दरात बदल :
आज 23 कॅरेट सोन्याच्या दरात 744 रुपयांची वाढ झाली असून तो 1,27,276 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीमुळे हा दर 1,31,860 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्यातही 684 रुपयांची वाढ झाली असून त्याचा तोळा दर 1,17,738 रुपये झाला आहे. जीएसटीसह तो 1,21,270 रुपये इतका आहे.
18 कॅरेट सोन्यात 560 रुपयांची वाढ होऊन दर 96,401 रुपये झाला आहे, तर जीएसटीसह किंमत 99,293 रुपये झाली आहे. मात्र 14 कॅरेट सोन्यात घसरण झाली असून ते 43,7 रुपयांनी स्वस्त होऊन 75,193 रुपये इतके झाले आहे. जीएसटीसह दर 77,448 रुपये आहे. (Gold price today)
सराफा बाजारातील हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दररोज दोन वेळा म्हणजेच दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता जाहीर करते. शहरानुसार सोन्या, चांदीच्या दरात 1,000 ते 2,000 रुपयांचा फरक पडू शकतो.






