Today Gold Price | आज 17 जुलै 2025 रोजी सोनं आणि चांदीच्या दरात सौम्य चढ-उतार पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली असली, तरी फ्युचर्स मार्केटमध्ये मात्र किंमत घसरल्याचं दिसून आलं. सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई जवळ आल्याने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
आज 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम ₹99,330 रुपये झाले असून, त्यामध्ये ₹50 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, 22 कॅरेट सोनं ₹91,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. त्यामुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना किंमतीत फारसा फरक जाणवणार नाही. (Today Gold Price)
MCX वर घसरण, चांदीचाही दर खाली :
तथापि, MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वरील सोन्याच्या ऑगस्ट वायद्याच्या दरात थेट ₹300 ची घट नोंदवण्यात आली असून, याचा नवीन दर ₹97,427 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी याला नफा बुकिंगची संधी मानली जात आहे.
चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सराफा बाजारात चांदी ₹1,13,900 प्रति किलो झाली आहे, तर फ्युचर्स मार्केटमध्ये सप्टेंबर वायद्याचा दर ₹66 ने घसरून ₹1,11,420 प्रति किलो नोंदवला गेला आहे. त्यामुळे चांदीमध्ये थोडीशी अनिश्चितता कायम आहे.
Today Gold Price | जागतिक बाजाराची झलक :
जागतिक पातळीवर स्पॉट गोल्ड $3,341.37 प्रति औंस आणि चांदी $38.05 प्रति औंस होती. डॉलरच्या मजबुतीमुळे जागतिक बाजारातही किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या पुढील व्याजदर धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही स्पष्टपणे दिसतोय. (Today Gold Price)
दरम्यान, सध्या सोन्याच्या किंमतीतील सौम्य चढउतार म्हणजे बाजार स्थिरतेच्या टप्प्यात आहे. काहीसा विश्वास टिकून असून, गुंतवणूक सुरू ठेवण्यासारखी स्थिती आहे. चांदीमध्ये मात्र किंमतीचा दबाव अधिक जाणवतोय.






