Today Gold Price | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी सामान्य नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठा चढ-उतार सुरू असून, आज (5 जानेवारी) पुन्हा एकदा दरांनी उसळी घेतली आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. (Today Gold Price)
तज्ज्ञांच्या मते, 2026 मध्येही सोने आणि चांदीच्या किमती वाढत राहण्याची शक्यता असून, त्याची सुरुवात आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. कधी अचानक दर घसरतात, तर कधी बाजार उघडताच सोने-चांदीचे भाव थेट उच्चांक गाठताना दिसत आहेत. आजचा दिवस हा त्याचाच प्रत्यय देणारा ठरला आहे.
जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ :
सुनर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी उडी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही धातूंनी आज नवे उच्चांक गाठले आहेत. (Gold Rate 2026)
या वाढलेल्या दरांनंतर सोन्याचा भाव जीएसटीसह थेट 1 लाख 39 हजार 668 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह तब्बल 2 लाख 47 हजार 200 रुपये प्रति किलो झाला आहे. या दरवाढीमुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Today Gold Price | सोनं दीड लाखांच्या दिशेने? :
बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, लवकरच सोन्याचा दर दीड लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही अडीच लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि देशांतर्गत मागणी याचा थेट परिणाम या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Today Gold Price)
दरम्यान, सोने आणि चांदीच्या (Silver Price Today) दरात सतत चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बाजारातील स्थिती बदलताच या दोन्ही धातूंचे मूल्य झपाट्याने वाढते किंवा घटते. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन आणि विचारपूर्वकच सोन्या-चांदीत गुंतवणूक करावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.






