सोन्याच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

On: November 26, 2025 4:18 PM
Today Gold Rate
---Advertisement---

Gold Rate | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीनंतर काहीसा उतार दिसल्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचा बाजार तेजीत आहे. जागतिक संकेत, व्याजदरातील संभाव्य बदल आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोने आज पुन्हा ‘चकाकताना’ दिसत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना या अचानक उसळीने धक्का बसला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळणाऱ्या संकेतांचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम होत असून, त्याचा प्रत्यय आजच्या सोन्याच्या दरातून स्पष्टपणे दिसून येतो. एका दिवसात सोन्याच्या भावात झालेल्या वाढीनं गुंतवणूकदार पुन्हा एकदा सावध झाले आहेत, तर सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी खर्चाची गणितं पुन्हा मांडायला सुरुवात केली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा मोठा उछाल; चांदीही वाढली तेजीत :

25 नोव्हेंबरला सोन्याचा भाव तब्बल 1% वाढला होता. त्या वाढीनंतर आज म्हणजे 26 नोव्हेंबरलाही भावात लक्षणीय वाढ कायम राहिली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसतो आहे.

एमसीएक्सवर डिसेंबरमध्ये एक्स्पायर होणाऱ्या गोल्ड कॉन्ट्रॅक्टचा दर आज सकाळी 0.5% वाढून 1,25,835 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीतही तेजीत वाढ दिसली असून डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट 0.91% वधारून 1,57,750 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

ही आकडेवारी पाहता गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याकडे आकर्षित होताना दिसत आहे.

Gold Rate | देशातील प्रमुख शहरांत सोन्याचा भाव किती? :

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दरांचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवरही झाला आहे. चेन्नई हे भारतातील सर्वाधिक दराचे शहर ठरले असून, तेथे 24 कॅरेट सोनं 1,28,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. 22 कॅरेटचा दर 1,18,000 रुपये नोंदवला आहे.

मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,27,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. तर 22 कॅरेट सोनं 1,17,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव त्याहून जास्त असून 1,28,060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे.

शहरानुसार दरांमध्ये फरक असला तरी सर्वत्र सोन्याचा ‘ट्रेंड’ सध्या वरच्या दिशेनेच असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, सोने आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये सातत्याने होत असलेल्या चढउतारांमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढला आहे.

News Title: Gold Prices Skyrocket: Massive Jump Per 10 Grams—Check Today’s Updated Rates in Major Indian Cities

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now