Gold Price Today | तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, सोन्याच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली असून, सामान्य खरेदीदार मात्र आनंदी झाले आहेत.
सोन्याचा दर गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत असून, लग्नसराईच्या दिवसांत दागिने खरेदी करणार्यांना याचा मोठा फायदा होतो आहे. गुंतवणुकीसाठी सोनं विकत घेतलेल्यांच्या परताव्यावर मात्र परिणाम दिसू लागला आहे. (Gold Price Today)
सोनं स्वस्त, चांदीतही घट :
आज, शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४३९ रुपयांनी घसरून ₹१,२०,२३१ प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ₹१,२३,८३७) इतकी झाली आहे. तर चांदीचा दर २३२ रुपयांनी घसरून जीएसटीशिवाय ₹१,४८,०१० प्रति किलो आणि जीएसटीसह ₹१,५२,४५० झाला आहे.
म्हणजेच, सध्या सोन्याचे दर मागील महिन्याच्या उच्चांकाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरले आहेत. ग्राहकांना या घटनेचा थेट फायदा होत असून, लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Gold Price Today | गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण :
१७ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकावरून सोनं तब्बल ₹१०,६४३ ने स्वस्त झाले आहे. तर चांदी १४ ऑक्टोबरच्या उच्चांकावरून तब्बल ₹३०,०९० ने घसरली आहे. या सततच्या घसरणीमुळे सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. (Gold Price Today)
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी होणे, डॉलरचा दर वाढणे आणि व्याजदरांमधील बदल हे घटक सोन्याच्या दरावर परिणाम करत आहेत. त्यामुळे सध्याचा काळ गुंतवणुकीपेक्षा खरेदीसाठी अधिक अनुकूल मानला जात आहे.
कॅरेटनुसार आजचे दर
२४ कॅरेट सोने: ₹१,२०,२३१ (जीएसटीसह ₹१,२३,८३७)
२३ कॅरेट सोने: ₹१,१९,७५० (जीएसटीसह ₹१,२३,३४२)
२२ कॅरेट सोने: ₹१,१०,१३२ (जीएसटीसह ₹१,१३,४३५)
१८ कॅरेट सोने: ₹९०,१७३ (जीएसटीसह ₹९२,८७८)
१४ कॅरेट सोने: ₹७०,३३५ (जीएसटीसह ₹७२,४४५)






