Gold Price | गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी दर वाढताना तर कधी किंचित घसरताना दिसत असल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः आखातातील युद्धजन्य परिस्थितीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आज विविध शहरांमध्ये सोन्याचे दर नेमके किती आहेत, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली आणि मुंबईतील सोन्याचे दर :
देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या दिल्ली (Delhi) शहरात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 1,63,800 रुपये इतकी नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,50,150 रुपये इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 1,22,880 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सोन्याचे दर ऐकून अनेक ग्राहक आश्चर्यचकित झाले आहेत.
मुंबई (Mumbai) बाजारातही सोन्याचे दर जवळपास त्याच पातळीवर असल्याचे दिसून आले आहे. येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,63,640 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,730 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असल्याचे बाजारातून समोर आले आहे.
Gold Price | युद्धजन्य परिस्थितीत सोन्याची मागणी वाढली :
जागतिक पातळीवर तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधू लागतात. अशा वेळी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठे महत्त्व दिले जाते. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. (Today Gold Price)
भारतातील सांस्कृतिक परंपरेत सोन्याला विशेष स्थान आहे. दागिन्यांच्या स्वरूपात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लग्नसमारंभ, सण आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी कायम राहते. मात्र तज्ज्ञांचे मत असे आहे की सोन्या-चांदीच्या दरांबाबत दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.






