Gold Rate l सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत असून, त्याचा परिणाम सरळपणे सोन्याच्या दरांवर होत आहे. परिणामी, आज सोन्याचा दर तब्बल 1,01,400 रुपये प्रति तोळा या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.
लग्नसराईत सोनं महागलं :
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आधीच सोन्याला मागणी (Gold Rate Increase) वाढलेली असताना आता दरवाढीमुळे सामान्य खरेदीदारांचे बजेट ढासळण्याची शक्यता आहे. केवळ शोभेची वस्तू म्हणून नव्हे, तर गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या टेन्शनमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान मागील काही महिन्यांत सातत्याने वाढणारे दर आता 1 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. (Gold Rate)
Gold Rate l जागतिक मंदीची भीती; गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित पर्यायांकडे :
चीन-अमेरिका दरम्यान वाढणाऱ्या तणावामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक मंदी येण्याची शक्यता गुंतवणूकदारांना सतावत असून, अशा परिस्थितीत पारंपरिक व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे झुकाव वाढला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी (Gold Rate) वाढत आहे आणि दरही झपाट्याने वर जात आहेत.
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांतही सोन्याचे दर चढे राहू शकतात. त्यामुळे अधिक परतावा मिळवण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. हीच गोष्ट आता प्रत्यक्षात उतरतेय, असंही स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ असू शकतो.






