गुढीपाडव्याला सोन्याचा भाव वाढणार की कोसळणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

On: March 18, 2026 5:33 PM
Gold
---Advertisement---

Gudi Padwa Gold Rate | साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा (Gudi Padwa) हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. मात्र यंदा सोन्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वाढती मागणी यामुळे सोन्याने विक्रमी पातळी गाठली असून आता गुंतवणूक करावी की थांबावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ :

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जागतिक स्तरावरील राजकीय तणाव, अमेरिकन डॉलरमधील चढउतार आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वाढलेला कल ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच भारतातही सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. (Gudi Padwa Gold Rate)

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, गुढीपाडव्याच्या आसपास सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पीएनजी ज्वेलर्स (PNG Jewellers) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ (Dr. Saurabh Gadgil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किंमतीत सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. लग्नसराईचा हंगाम आणि पुढील अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) यामुळेही सोन्याची मागणी वाढत आहे.

Gudi Padwa Gold Rate | दागिने घ्यावेत की नाणी/बिस्किटे? :

सोनं खरेदी करताना उद्देश स्पष्ट असणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जर वापरासाठी सोने खरेदी करायचे असेल तर दागिने हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येत आहे.

मात्र केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने घ्यायचे असल्यास सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करणे अधिक फायदेशीर मानले जाते. दागिन्यांवर मेकिंग चार्जेस जास्त असतात, जे विक्रीच्या वेळी परत मिळत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी शुद्धतेची खात्री असलेले नाणे किंवा बिस्किटे अधिक योग्य पर्याय मानले जातात.

डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बाँडचा पर्याय :

सध्याच्या काळात डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETF) यांसारखे पर्यायही लोकप्रिय होत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अगदी कमी रकमेपासूनही सोन्यात गुंतवणूक करता येते. त्यामुळे प्रत्यक्ष सोने घरी ठेवण्याचा धोका टाळता येतो.

तसेच सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond – SGB) हा देखील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. या योजनेत सोन्याच्या किंमती वाढल्याचा लाभ मिळतोच, शिवाय दरवर्षी सुमारे 2.5 टक्के व्याजही मिळते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय सुरक्षित मानला जातो.

News Title: Gold Price Prediction for Gudi Padwa: Should You Invest in Gold Now?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now