Gold Price in India | सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून, अशा काळात सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेली मोठी वाढ ग्राहकांच्या खिशाला चटका लावणारी ठरत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोन्याने 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला होता. त्यानंतर किंमत थोडी खाली आली असली तरी 95 ते 97 हजारांच्या घरात स्थिरावलेली आहे.
गुरुवारी (1 मे 2025) रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे नवे दर जाहीर झाले आहेत. यामध्ये कुठे सोनं सर्वात स्वस्त आहे आणि कुठे महाग, याची माहिती घेणं ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. विशेष म्हणजे, 24 कॅरेट सोन्याचा सर्वात महाग दर अहमदाबाद आणि इंदूर या शहरांमध्ये नोंदवला गेला आहे. (Gold Price in India)
कोणत्या शहरात किती आहे सोन्याचा भाव? :
सर्वसामान्य 24 कॅरेट दर (प्रति 10 ग्रॅम):
दिल्ली: ₹95,880
मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद, कोलकाता: ₹95,730
अहमदाबाद, इंदूर: ₹97,580 (सर्वाधिक)
लखनऊ: ₹95,880
22 कॅरेट दर (प्रति 10 ग्रॅम):
दिल्ली, लखनऊ: ₹87,900 (सर्वाधिक)
अहमदाबाद, इंदूर: ₹87,800
मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद, कोलकाता: ₹87,750
Gold Price in India | कोणत्या शहरात सोने सर्वात स्वस्त? :
वरील दरांनुसार, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि हैदराबाद या शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं सर्वात स्वस्त म्हणजे ₹95,730 प्रति 10 ग्रॅम दराने मिळत आहे. 22 कॅरेटसाठीही हेच दर सर्वात कमी आहेत – ₹87,750.
सोन्याच्या वाढत्या दरामुळे लग्नसराईतील खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अस्थिरतेचा परिणाम अजून काही काळ जाणवणार असून, त्यामुळे सोन्याचे दर पुढील काही आठवड्यांत वाढू शकतात. (Gold Price in India)






