सोन्याच्या दरात तुफान तेजी येणार; दिवाळीपर्यंत 1 तोळा सोनं ‘इतके’ लाख होण्याची शक्यता!

On: August 7, 2025 10:36 AM
Today Gold Price
---Advertisement---

Gold Price Hike | गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोने विक्रमी पातळीवर पोहोचले असून, आता दिवाळीच्या सणासुदीच्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1 तोळा सोनं 1,10,000 ते 1,12,000 रुपये दरम्यान विकले जाण्याची शक्यता असून, गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी ठरू शकते.

सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या 29 ऑगस्ट एक्सपायरी कॉन्ट्रॅक्टमध्ये 1,01,210 रुपयांचा उच्चांक नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय COMEX मार्केटमध्ये सोनं 3430 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. ही वाढ थांबण्याची चिन्हं नसून, अजूनही तेजी कायम राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. (Gold Price Hike)

दिवाळीत सोन्याचा नवा उच्चांक गाठण्याची शक्यता :

Emkay Global Financial Services च्या रिसर्च अ‍ॅनालिस्ट रिया सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तणाव, डॉलरची अस्थिरता, आणि मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी यामुळे दिवाळीत सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचतील. यासोबतच चांदीचाही दर 1 किलोसाठी 1,20,000 ते 1,25,000 रुपये दरम्यान राहील, असा अंदाज आहे.

भारतासह चीन, रशिया, तुर्की आणि कझाकिस्तानसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील कमकुवत आकडेवारी आणि ट्रम्प सरकारच्या नवीन टॅरिफमुळे सोन्याकडे पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे.

Gold Price Hike | गेल्या सहा वर्षांत सोन्याच्या किमती 200% वाढल्या :

सोन्याच्या दरात गेल्या सहा वर्षांत 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनानंतरच्या काळात वाढलेली अनिश्चितता, भू-राजकीय संघर्ष आणि डॉलरवरील दबावामुळे सोने हे गुंतवणुकीचं सुरक्षित साधन बनलं आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती बँकांनी आपली धोरणात्मक राखीव रक्कमही सोन्यात गुंतवली आहे. (Gold Price Hike)

त्यासोबतच, भारतात नव्याने 9 कॅरेट सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसह विक्रीसाठी आले आहेत. यामुळे कमी किमतीत दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढू शकतो. परिणामी सोन्याच्या एकूण मागणीत वाढ होणार आहे.

News Title: Gold Price Hike: Gold May Hit ₹1.12 Lakh per 10g by Diwali 2025 – Know Why

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now