Gold Price | गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2025 हे वर्ष मौल्यवान धातूंसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून, या काळात सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. नव्या वर्षातही हीच तेजी कायम राहिल्याचे चित्र असून, त्यामुळे सामान्य नागरिकांसह गुंतवणूकदारांमध्येही चर्चा रंगू लागली आहे. वर्षभरात सोनं नेमकं किती महाग होणार, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.
सध्याच्या बाजारस्थितीचा विचार करता, आगामी काळात सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे पाहिले जात असून, जागतिक आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम या धातूंच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2025 मध्ये सोन्या-चांदीने दिले भरघोस रिटर्न :
2025 या वर्षात सोन्याने तब्बल 66 टक्क्यांपर्यंत परतावा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पारंपरिक गुंतवणूक म्हणून ओळखले जाणारे सोने पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. वाढती महागाई, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. (Today Gold Price)
चांदीने तर सोन्यालाही मागे टाकत तब्बल 171 टक्क्यांचा परतावा दिला आहे. औद्योगिक वापर, तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील हालचाली यामुळे चांदीच्या दरात अभूतपूर्व वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा कल चांदीकडेही वाढताना दिसत आहे.
Gold Price | भविष्यात दर कुठपर्यंत जाणार? :
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. भारतीय चलनात विचार केला, तर भविष्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.70 लाख रुपयांपासून थेट 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आली, तर सामान्य ग्राहकांसाठी सोनं खरेदी करणे अधिकच अवघड ठरणार आहे. (Silver Price Prediction)
चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, तिचा दर भविष्यात 100 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ चांदीचा भाव प्रति किलो 2.8 लाख रुपयांपासून 3.3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने ही वाढ फायदेशीर ठरू शकते, मात्र दागिने किंवा वापरासाठी खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.






