दिवसाढवळ्या लूट! पुण्यात प्लॅस्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे सोनं लंपास

On: April 15, 2025 7:24 PM
---Advertisement---

Pune |  विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणारे पुणे शहर सध्या गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चर्चेत आहे. एका मागोमाग एक अशा हत्या, चोरी, अपहरण आणि दरोड्यांच्या घटना समोर येत असून, पुणे गुन्हेगारीच्या नकाशावर झपाट्याने पुढे जात आहे. अलीकडेच शहरातील धायरी परिसरात भरदिवसा एका सराफ दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात आला असून, तीन जणांनी मिळून दुकानातून तब्बल २५ तोळे सोन्याचे (gold ) दागिने लंपास केले आहेत.

दिवसाढवळ्या सराफ दुकानात चोरी

ही घटना धायरीतील (Pune) ‘श्री ज्वेलर्स’ या सराफ दुकानात (Jwellery Shop ) घडली आहे. या दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ हे सकाळच्या वेळेस दुकानातच उपस्थित होते. त्याच दरम्यान, तिघेजण ग्राहकाच्या वेशात दुकानात आले. त्यांनी काही क्षणातच प्लॅस्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराला गोंधळात टाकले आणि दुकानातील दागिने लुटण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांत ते २० ते २५ तोळे सोन्याचे (25 Tola Gold) दागिने घेऊन फरार झाले.

प्लॅस्टिकच्या बंदुकीचा वापर करून धमकी

पोलीस (Pune Police )तपासात हे उघडकीस आले आहे की दरोडेखोरांनी खऱ्या बंदुकीऐवजी खेळण्यातील बंदूक (gun) वापरली होती. मात्र, त्याचा उपयोग करून त्यांनी जे धाडस केलं, ते नक्कीच धक्कादायक आहे. सध्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोनं हे आधीच मौल्यवान असल्याने अशा घटनांमुळे सराफ व्यावसायिक अधिक अस्वस्थ झाले आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार लुटलेले सोनं जवळपास २५ लाख रुपये किमतीचं असल्याचं अनुमान आहे.

शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भरदिवसा अशा प्रकारे दरोडा पडतो, आणि तो ही खेळण्याच्या बंदुकीच्या मदतीने – ही गोष्ट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता पाहावं लागेल की पुणे पोलिस प्रशासन या गुन्हेगारांना किती लवकर ताब्यात घेते आणि अशा घटना रोखण्यासाठी काय पावलं उचलते.

Title : gold looted in Pune by threatening with plastic gun

Join WhatsApp Group

Join Now