नवी दिल्ली | ओडिशामधील 3 जिल्ह्यांमध्ये जमीनीखाली मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे (Gold Mines) असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण आणि ओडिशा सरकारच्या भूविज्ञान निर्देशालयाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देवगड, क्योंइर आणि मयूरभंज जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. हे साठे 59 टनांचे आहेत. चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर हे जगातील सर्वात मोठे लिथियम साठे असल्याचं सांगितलं जात आहे.
या साठ्यांमध्ये लिथियम निर्मितीमध्ये भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लिथियम हा असा नॉन फेरस धातू आहे ज्याचा वापर मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक व्हेइकलबरोबरच अनेक उपकरणांमध्ये केला जातो ज्यामध्ये रिचार्जेबल बॅटरी वापरली जाते. आतापर्यंत यासाठी भारत इतर देशांवर अवलंबून होता.
ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी सोन्याच्या साठ्यांसंदर्भातील प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी 3 जिल्ह्यांमध्ये ‘खजाना’ मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-






