सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर

On: November 12, 2023 12:30 PM
---Advertisement---

मुंबई | धनत्रयोदशीला सोने-चांदीत (Gold Price) दरवाढ झाली होती. तरीही ग्राहकांनी बाजारपेठेत जोरदार खरेदी केली. अशाच आता सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात पण धनत्रयोदशी वगळता सोन्यात घसरण होती. 31 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली होती.

10 नोव्हेंबर रोजी सोन्यात 300 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी 450 रुपयांनी भाव उतरले. आता 22 कॅरेट सोने 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जाणून घ्या दर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता.

तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही http://www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

अभिजीत बिचुकलेंचं शिंदेंना पत्र, केली मोठी मागणी 

“मर्दाची अवलाद असेल तर…”; उद्धव ठाकरे भडकले

मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!

‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now