सोने-चांदीचे दर घसरले, ग्राहकांना मोठा दिलासा

On: February 12, 2026 11:27 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Today Gold Rate | सोनं आणि चांदीच्या दरातील सततच्या चढ-उतारानंतर आज पुन्हा एकदा बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंनी खाली येत ग्राहकांना दिलासा दिला. विशेषतः चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली असून ती उच्चांकाच्या तुलनेत तब्बल 1.59 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

एमसीएक्सवर चांदीची मोठी घसरण :

या वर्षाच्या सुरुवातीला सोनं-चांदीने विक्रमी पातळी गाठल्यानंतर अचानक घसरण अनुभवली होती. त्यानंतर दरात सतत चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीचा दर बुधवारी 2,63,018 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मात्र आज बाजार उघडताच तो थेट 2,60,453 रुपयांवर घसरला. म्हणजेच एका दिवसात प्रति किलो 2,565 रुपयांची घट झाली. (Today Gold Rate)

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या घडामोडींवरून नजीकच्या काळात चांदीचा दर 2 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र काही विश्लेषकांच्या मते, ही घसरण तात्पुरती ठरू शकते आणि पुढील काळात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सावध भूमिका घेत आहेत.

Today Gold Rate | उच्चांकावरून मोठी घसरण :

जानेवारी 2026 मध्ये चांदीने इतिहासात पहिल्यांदाच 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. 29 जानेवारी रोजी चांदीचा दर 4,20,048 रुपये प्रति किलोवर पोहोचून सर्वकालीन उच्चांक नोंदवला गेला. मात्र त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली. सध्याच्या दरानुसार चांदी प्रति किलो 1,59,595 रुपयांनी उच्चांकापेक्षा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही संधी मानली जात आहे. (Today Gold Rate)

चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही घट झाली आहे. 2 एप्रिल एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा दर बुधवारी 1,58,755 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर तो कमी होऊन 1,57,701 रुपयांवर आला. म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 1,054 रुपयांची घट झाली. विशेष म्हणजे 29 जानेवारी रोजी सोन्याने 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅम असा विक्रमी स्तर गाठला होता. त्या तुलनेत सध्या दर 35,395 रुपयांनी कमी आहेत.

News title : Gold and Silver Prices Drop Again

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now