Gold and Silver Price | गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांकावर असलेले सोन्या-चांदीचे दर आता अचानक घसरले आहेत. 30 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा भाव तब्बल 1.06 लाख रुपयांनी (सुमारे 26%) घसरून प्रति किलो 2.93 लाखांवर आला, तर सोन्याच्या दरात 20 हजार रुपयांची (12%) घट होऊन 10 ग्रॅम सोने 1.49 लाख रुपयांवर पोहोचले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम :
सराफा बाजारातही याचा परिणाम दिसून आला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शुक्रवारी चांदी 40,638 रुपयांनी घसरून प्रति किलो 3,39,350 रुपयांवर आली, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 9,545 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅमसाठी 1,65,795 रुपये झाली आहे. याशिवाय सोने आणि चांदीच्या ETF मध्येही 23% पर्यंत घसरण पाहायला मिळाली. (Gold and Silver Price News)
डॉलर मजबूत झाल्यावर सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. डॉलर निर्देशांक वाढल्याने रुपया, युरो आणि येनसारख्या इतर चलनांच्या तुलनेत डॉलर महाग होतो, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने-चांदी खरेदी महाग पडते. यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये विक्रीचा दबाव वाढतो आणि दर घसरतात. अमेरिका डॉलरचे जागतिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कठोर आर्थिक धोरण राबवते, याचाही परिणाम मौल्यवान धातूंवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (MCX gold rate)
Gold and Silver Price | सोन्या-चांदीचे दर घसरण्याची 3 प्रमुख कारणे :
अलीकडच्या काळात सोन्या-चांदीने विक्रमी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा बुकिंग केलं. त्यामुळे बाजारात अचानक विक्रीचा दबाव वाढला आणि दर झपाट्याने घसरले.
दुसरं कारण म्हणजे भौतिक मागणीत घट. सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर दागिने आणि औद्योगिक वापरासाठी मागणी कमी झाली, ज्यामुळे किमतींवर नकारात्मक परिणाम झाला. (Gold and Silver Price News)
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडी. चीनकडून धातूंच्या निर्यातीबाबत कडक नियम, तसेच डॉलरच्या मजबुतीमुळे कमोडिटी बाजारात अस्थिरता वाढली असून याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत आहे.






