Today Gold Price | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार होत आहेत. कधी भाव वधारतो तर कधी अचानक गडगडतो. त्यामुळे ग्राहक, गुंतवणूकदार आणि सराफा बाजारातील व्यापारी गोंधळले आहेत. २६ सप्टेंबरच्या सकाळी पुन्हा एकदा सोन्यात तेजी तर चांदीत मंदी दिसून आली. (Today Gold Price)
सोन्याच्या भावात उचल :
वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या दरात वाढ झाली. सकाळी ९.३० वाजता सोने प्रति १० ग्रॅम १७४ रुपयांनी महागले. गेल्या दोन दिवसांत १० ग्रॅम सोनं तब्बल १,२५० रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र आज सकाळी १० ग्रॅम सोनं ४०० रुपयांनी वाढून पुन्हा महागलं. (Gold Rate)
२४ कॅरेट सोने (१ ग्रॅम) : ₹११,४८८
२२ कॅरेट सोने (१ ग्रॅम) : ₹१०,५३०
IBJA नुसार सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने ₹१,१३,३५०, २३ कॅरेट ₹१,१२,९००, तर २२ कॅरेट सोने ₹१,०३,८३० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. १८ कॅरेटचा भाव ₹८५,००१ आणि १४ कॅरेट सोने ₹६६,३१० रुपये इतका नोंदला गेला.
Today Gold Price | चांदीची झेप आणि मंदी :
चांदीने २२ सप्टेंबर रोजी तब्बल ₹३,००० ची झेप घेतली होती. त्यानंतर दोन दिवस किंमती स्थिर राहिल्या. मात्र २६ सप्टेंबरला पुन्हा चांदीने उसळी घेतली आणि एक किलो चांदीचा भाव ₹१,४३,००० इतका पोहोचला. तर IBJA नुसार, सराफा बाजारात चांदीचा दर ₹१,३७,०४० प्रति किलो नोंदला गेला. वायदे बाजार आणि सराफा बाजारातील कर व शुल्कामुळे भावात तफावत दिसून येत आहे. (Today Silver Price)
सोन्या-चांदीच्या भाववाढीमागे जागतिक बाजारातील अस्थिरता प्रमुख कारण ठरत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केली असून, यावर्षाअखेरीस आणखी कपातीचे संकेत दिले आहेत. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. मागणी वाढल्याने दर भडकले आहेत. डॉलर आणि बाँड मार्केटवरही याचा थेट परिणाम झाला असून सोने-चांदीत तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






