सोने-चांदीचे दर गडगडले; जाणून घ्या आजचे दर

On: February 13, 2026 11:25 AM
Today Gold Price
---Advertisement---

Today Gold Price | लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरात सातत्याने चढ-उतार होत असताना शुक्रवारी (१३ फेब्रुवारी २०२६) भावात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. त्यामुळे दागिने खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Today Gold Price)

दरम्यान, गुंतवणूकदारांसाठी मात्र ही घसरण चिंतेची बाब ठरू शकते. सोन्याच्या किमतीत अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारातील अस्थिरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे (Pune), नागपूर, कोल्हापूर (Kolhapur), जळगाव, सांगली आणि बारामती या प्रमुख शहरांमध्ये आज एकसमान दर नोंदवण्यात आले आहेत.

२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर :

२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम तब्बल २६,२०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे १०० ग्रॅमचा दर १५,८४,००० रुपयांवरून १५,५७,८०० रुपयांवर आला आहे. तसेच १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर २,६२० रुपयांनी कमी होऊन १,५८,४०० रुपयांवरून १,५५,७८० रुपये झाला आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर १,५५,७८० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्यातही मोठी घसरण झाली असून प्रति १०० ग्रॅम २४,००० रुपयांनी दर खाली आला आहे. त्यामुळे १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४५,२०० रुपयांवरून १,४२,८०० रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम १९,६०० रुपयांची घट झाली असून १० ग्रॅमचा दर १,१८,८०० रुपयांवरून १,१६,८४० रुपये इतका झाला आहे.

Today Gold Price | चांदीच्या दरातही मोठी घट :

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो तब्बल १५,००० रुपयांनी खाली आला असून सध्या तो २,८०,००० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्यामुळे ही घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. (Today Gold Price)

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या तुलनेत रुपयातील बदल आणि मागणी-पुरवठ्याचा समतोल यामुळे दरात चढ-उतार होत असतात. आगामी काही दिवसांतही दरात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ताजे दर तपासूनच व्यवहार करण्याचा सल्ला दिला जात आहे.

News Title: Gold and Silver Price Today 13 February 2026: Major Fall in Rates, Check Mumbai and Pune Prices

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now