महाशिवरात्रीला ‘या’ ७ राशींवर होणार शिवकृपा! भाग्य उजळणार

On: February 12, 2026 5:44 PM
Mahashivratri 2026
---Advertisement---

Mahashivratri 2026 | महाशिवरात्री 2026 (Mahashivratri 2026) च्या काळात ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे बदल होणार असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. पंचांगानुसार, यंदा 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी होणार असून याच दिवशी मंगळ, चंद्र आणि बुध या तीन ग्रहांचे एकामागून एक संक्रमण होणार आहे. या विशेष ग्रहयोगांचा परिणाम सात राशींवर अत्यंत शुभ मानला जात आहे.

ज्योतिषांच्या मते, या दिवशी मंगळ श्रवण नक्षत्र सोडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल, चंद्र मकर राशीत संक्रमण करेल तर बुध शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात जाईल. या ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे आर्थिक, करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या राशींना मिळणार विशेष लाभ :

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि नवीन गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्य सामान्य राहण्याचा अंदाज आहे, मात्र आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी नोकरी किंवा व्यवसायात बदल फायदेशीर ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वासात वाढ होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ मानला जात आहे. घरगुती बाबींमध्ये समाधान मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल आणि आरोग्यही चांगले राहील.

Mahashivratri 2026 | सिंह ते मीन राशींसाठी काय संकेत? :

सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये महत्त्वाचे फायदे मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असून व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. जोडीदार आणि कुटुंबाशी नातेसंबंध मजबूत होतील तसेच नवीन व्यवसाय योजना यशस्वी होण्याचे संकेत आहेत.

मकर राशीच्या लोकांना भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थैर्य लाभेल. जुने वाद मिटतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक लाभाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मीन राशीच्या लोकांसाठी नोकरी किंवा व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जुनी कर्जे किंवा समस्या सुटण्याचे संकेत असून शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात यश मिळू शकते. (Mahashivratri 2026)

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची विशेष कृपा या राशींवर राहणार असल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रीय भाकिते ही सामान्य अंदाजांवर आधारित असून व्यक्तीच्या कुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात, असेही तज्ज्ञ सांगतात.

News Title: 3 Planet Transits on Mahashivratri 2026 to Bring Wealth for 7 Zodiac Signs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now