‘ऐका…असं करू नका’; गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांना फोन

On: October 25, 2023 12:33 PM
---Advertisement---

जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात 14 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांंना आरक्षण देऊ, असा शब्द दिल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. जालना येथे जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सभा घेतली.

सभा सुरु असताना जरांगे पाटालांनी सरकारला इशारा देत जर 24 ओक्टोबरपर्यंत आरक्षण नाही मिळालं तर पुन्हा एकदा उपोषणाला बसू असं म्हटलं होतं. दरम्यान जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं. या वेळी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जरांगे यांच्याशी फोनवर संवाद साधला.

काय म्हणाले गिरिश महाजन?

गिरिश महाजनांनी जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याचं आव्हान केलंय. मात्र मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आता थांबणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. पुढे गिरीश महाजन म्हणाले तुमच्या तीन चार मागण्या आज पूर्ण करतो. आपल्याला सर्वोच्च न्यायालयात टीकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे शिंदे समितीला वेळ लागत आहे. आम्हाला आणखी वेळ द्या.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now