हरवलेलं पॅनकार्ड ‘अशा’ पद्धतीनं मिळवा परत

On: December 13, 2022 6:05 PM
---Advertisement---

मुंबई |आता बॅंकेतील(Bank) अनेक महत्वांच्या कामांसाठी पॅनकार्ड(PAN Card) अनिवार्य झालं आहे. तसेच नोकरदारांसाठी तर पॅनकार्ड अति महत्वाचं आहे. त्यामुळं आता पॅनकार्ड अनेकांच्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनलं आहे.

पण बऱ्याचदा आपलं पॅनकार्ड कुठंतरी हरवतं. अशावेळी तुमची बरीच काम अडखळतात. तसेच तुम्हाला अनेक आर्थिक व्यवहारातही अडचण येऊ शकते. म्हणूनच ज्यांचं पॅनकार्ड हरवलं आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. कारण काही स्टेप्सद्वारे तुम्ही तुमचं पॅनकार्ड परत मिळवू शकता.

जर तुमचं पॅनकार्ड हरवलं तर तुम्ही सर्वप्रथम आयकर पॅन सर्विसेस युनिटच्या वेबसाइटला भेट द्यावी. या वेबसाइटवर तुम्हाला रीप्रिंट पॅन असा पर्याय दिसेल. तुम्हला हा पर्याय निवडावा लागेलं.

यानंतर तुम्हाला एक फाॅर्म मिळेल. हा फाॅर्म तुम्हाला भरावा लागेल. या फाॅर्मसोबत 150 रूपये फीदेखील भरावी लागते. या फार्मची एक प्रिंट काढा. या फाॅर्मवर तुमची सही करा आणि फोटोही लावा. तसेच तुम्ही पेमेंट केल्याचीही पावती या फाॅर्मसोबत जोडा.

हा फाॅर्म पुण्याच्या NSDL कार्यलयात पाठवावा. या फाॅर्मसोबत जन्मतारेखचा पुरावाही पाठवावा लागतो. यासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र आणि 10 वीचे प्रमाणपत्र पाठवावे.

फाॅर्म पाठवल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमचे पॅनकार्ड तयार होते. पॅनकार्ड तयार झाल्यानंतर ते तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येतो.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now