Geeta Kapur Quits Bollywood | बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर गीता कपूर उर्फ ‘गीता माँ’ हिनं अखेर बॉलिवूडमध्ये पुन्हा न येण्याचा निर्णय घेतला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत तिनं स्पष्टपणे सांगितलं की, ती आता कमबॅक करणार नाही आणि जिथे आहे, तिथेच खूश आहे.
गीता कपूरनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केवळ १७ व्या वर्षी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केली होती. तिनं फराह खानसोबत ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. टेलिव्हिजनवर देखील ती अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून झळकली. (Geeta Kapur Quits Bollywood)
“आता नव्या प्रतिभेला संधी देण्याची वेळ आहे” – गीता कपूर :
मुलाखतीत गीता कपूरला विचारण्यात आलं की, ती पुन्हा बॉलिवूडमध्ये केव्हा दिसेल? यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझा परत येण्याचा काहीच विचार नाही. आता नव्या पिढीला संधी मिळायला हवी. आम्ही जेवढं कमवायचं, शिकवायचं आणि शिकायचं होतं, ते सगळं मिळालं आहे.”
ती पुढे म्हणाली, “जर कधी काही असं प्रोजेक्ट समोर आलं की मला त्याच्याशी खूप आत्मीयता वाटली, तर कदाचित करेन. पण नुसतं परत यायचं म्हणून नाही.”
Geeta Kapur Quits Bollywood | “कामाची कमतरता आहे, इतरांना संधी द्या” :
गीता कपूरनं आजच्या इंडस्ट्रीतील परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं, “आजच्या चित्रपटांमध्ये गाणीच नसतात, डान्स अजूनच नाहीत. आमच्या काळात ८-१० गाणी असायची, मोठे सेट, दमदार डान्स सीन्स असायचे. आता काम कमी झालंय आणि अशावेळी आम्ही तेच पकडून बसलो, तर इतरांना कधी संधी मिळणार?” (Geeta Kapur Quits Bollywood)
ती पुढे म्हणाली की, “मला कॉपी-पेस्ट काम नकोय. मला सर्जनशील काम करायचं आहे. आणि मी सध्या जिथे आहे, तिथेच समाधानी आहे.”






