“माझ्या वडिलांमुळेच…”, गौतमीने सांगितलं आपल्या यशामागचं खरं कारण

On: September 25, 2023 2:31 PM
---Advertisement---

मुंबई | बहुचर्चित नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या डान्समुळे आणि कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे कायम चर्चेचा विषय ठरते.

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना गौतमीने आपल्या वडिलांविषय सांगितलं. माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या आई आणि वडिलांना देते असं ती म्हणाली. जर वडिल सोबत असते तर मी आज इथपर्यंत आले नसते. आमच्या समाजात नृत्याच्या क्षेत्रात परवानगी देत नाहीत.

वडिल आमच्यासोबत असते तर त्यांनी मला या क्षेत्रात येऊ दिलं नसतं उलट आतापर्यंत माझं लग्न होऊन माझ्या हातात एक पोरगं तरी असतं. आईने गौतमीचं शिक्षण केलं असलं तरी तिने तिच्या यशाचं श्रेय वडिलांना दिलं.

गौतमी म्हणाली की, मला वडिल आहेत हे माहित होतं. ते सारखे दारु प्यायचे त्यामुळे आम्ही सोबत राहत नव्हतो. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या वडिलांचं पुणे येथे निधन झालं.

थोडक्यात बातम्या-

लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांना अजित पवारांनी झापलं!

“रोहित पवार यांच्यासह सगळे…”; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने खळबळ

“मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…”

मोठी बातमी! अजित पवार मुख्यमंत्री होणार?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now