Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

On: December 13, 2023 9:24 PM
Gautami Patil Controversy
---Advertisement---

Gautami Patil | डीजे डान्सर गौतमी पाटीलची (Dancer Gautami Patil) क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गौतमीच्या लावणीला आणि तिला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. एवढंच नव्हे तर तिच्या कार्यक्रमात अनेक वेळा वाद देखील होत असतात. गौतमीच्या अश्लील डान्समुळे तिला अनेकांनी ट्रॉल केलं होतं.

गौतमीचा नवा चित्रपट

गौतमीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावल्यानंतर तिचा एक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या चित्रपटासाठी तिचे चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. घुंगरु हा चित्रपट लवकरच जवळच्या चित्रपटगृहात येत असून गौतमी सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.

“लावणी करताना भीती वाटते”

दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना गौतमीने तिच्या लावणी डान्सबद्दल एक खुलासा केला. ती म्हणाली की, मला काही दिवसांपूर्वी लावणी डान्स केल्यामुळे प्रचंड ट्रोल केलं होतं.

मात्र, आता मला लावणीवर डान्स करताना देखील भीती वाटते. पुढे ती म्हणाली की, ‘मी लावणी डान्सर नाहीये, मी एक डीजे डान्सर आहे.’

गौतमीने तिची कला फक्त शो पूर्तीच ठेवली नसून तिने दोन मराठी अल्बम साॅंगमध्ये सुद्धा काम केलंय. गौतमीचा कार्यक्रम ठेवायला आता कोणतंच कारण लागत नाही. नेत्यांपासून ते लहान मुलांच्या वाढदिवसापर्यंत सगळे तिला अमंत्रीत करत असल्याचं पाहायला मिळतंय.

एका कार्यक्रमात गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप केल्यामुळे लोकांनी तिच्यावर टीका करत तिचा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली होती. मात्र घडलेल्या प्रकारानंतर गौतमीने सगळ्यांची माफी मागितली.

News Title | gautami patil talks about lavani

थोडक्यात बातम्या-

Deepika Padukone | रणबीर नाही-रणवीर नाही; दीपिकाला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न

Gautami patil | मराठा समाजाला आरक्षण हवं की नको?, गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार… हवामान खात्याचा मोठा अलर्ट

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!

देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पत्ता कट?, राज्यात भाजपचं सरकार आलं तर ‘हे’ नेते होऊ शकतात मुख्यमंत्री 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now