Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली

On: December 8, 2023 10:34 AM
Rohit Sharma
---Advertisement---

नवी दिल्ली | भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या बेधडक वक्तव्यासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या या बेधडक वक्तव्यामुळे अनेकदा गौतम गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकतो. नाहीतर सतत चर्चेत तरी असतोच. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय.

गंभीरनं उडवली Rohit Sharma ची खिल्ली

गौतम गंभीरने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) एक वक्तव्य केलंय. गौतम गंभीरने रोहित शर्माची खास खिल्ली उडवली आहे. एका मुलाखतीदरम्यान गंभीरने रोहितची ही खिल्ली उडवली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौतम गंभीरने नुकतीच एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत गंभीरला प्रत्येक प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यावं लागलं. या मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आलं की, तो ज्यांच्यासोबत खेळला तो सर्वात फिट खेळाडू कोण आहे. यावर गंभीरने हसत रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव घेतलं. गंभीरला चुकीचं उत्तर द्यावं लागलं, त्यामुळेच त्याने रोहितचं नाव घेतलं.

गंभीरच्या या उत्तरानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खरोखरंच फिट खेळाडू नाही का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गंभीरच्या या उत्तरावर रोहित शर्माचे चाहते थोडे नाराज दिसले. मात्र माजी खेळाडूने हे उत्तर हसत-खेळत दिलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली अप्रतिम कामगिरी केली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 10 सामने जिंकले होते.

अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी संपूर्ण विश्वचषकात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. या स्पर्धेत त्याने 11 सामन्यात 597 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित भारतीय संघात परतणार आहे.

दरम्यान, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 असा जबरदस्त विजय मिळवला. आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रथम T-20 मालिका होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Karan-Tejasswi | करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

IPL | न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू तुमच्या संघात हवाच!, इरफान पठाणने कुणाला दिला मोलाचा सल्ला

Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”

Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य

Qualities In Men | महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे हवेत ‘हे’ गुण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now