कोच गौतम गंभीरचा दबदबा; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर मोठा बदल होणार

On: May 13, 2025 2:35 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

Gautam Gambhir | अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय (Indian) संघात (Team India) एक नवीन आणि तरुण चेहरा दिसणार आहे. लाल चेंडूच्या (Red Ball) या प्रकारात या दोन्ही दिग्गजांनी दीर्घकाळ आपले वर्चस्व गाजवले, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) मायदेशातील कसोटी मालिकेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील  निराशाजनक कामगिरीमुळे या दोन्ही खेळाडूंसाठी कसोटी  क्रिकेटमध्ये (Cricket) पुढे खेळणे कठीण झाले होते.

रोहित-कोहलीच्या निवृत्तीचा मोठा संदेश

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर\ रोहित (Rohit) आणि कोहलीच्या (Kohli) कसोटी भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतेच, परंतु ज्याप्रकारे इंग्लंडविरुद्धच्या पुढील महिन्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेकठीक आधी या दोन्ही फलंदाजांनी कसोटी  क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला, तो एक मोठा संदेश देऊन गेला. हा निर्णय भारतीय क्रिकेट  संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा ड्रेसिंग रूममध्ये किती दबदबा आहे, हे देखील दर्शवतो. नुकत्याच एका टीव्ही  चॅनेलच्या कार्यक्रमात गंभीर म्हणाले होते की, जोपर्यंत रोहित (Rohit) आणि कोहली (Kohli) चांगली कामगिरी करत आहेत, तोपर्यंत त्यांची संघातील (Team India) जागा पक्की आहे. परंतु, त्यांनी कसोटी (Test) स्वरूपाबद्दल कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हते.

प्रशिक्षक म्हणून गंभीर यांची कणखर भूमिका

भारतीय (Indian) क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा प्रशिक्षकांना आपली ताकद (Power) दाखवण्यासाठी किंवा मतभेदांमुळे पद सोडावे लागले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ग्रेग चॅपल. तर, अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी संघातील सुपरस्टार  संस्कृतीला कंटाळून प्रशिक्षकपद (Coach) सोडले होते. परंतु, गंभीर यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी दिसत असून, आता कर्णधारापेक्षा प्रशिक्षकाकडे अधिक अधिकार (Power) असल्याचे चित्र आहे. बिशन सिंह बेदी, चॅपल (Greg Chappell) आणि कुंबळे (Anil Kumble) हे स्वतः महान खेळाडू होते, परंतु त्यांना कर्णधाराच्या (Captain) सहाय्यकाची भूमिका (Role) करावी लागेल, असा विचारही त्यांनी केला नसेल. जॉन राईट (John Wright), गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि रवी शास्त्री  यांना याची कल्पना होती आणि ते यशस्वीही ठरले.

डब्ल्यूटीसीच्या नवीन चक्रात नवोदित संघ

रोहित (Rohit) आणि कोहलीच्या (Kohli) कसोटी निवृत्तीनंतर आता भारतीय कसोटी संघात फारसे अनुभवी (Experienced) खेळाडू उरलेले नाहीत. रविचंद्रन अश्विनने  ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हेच अनुभवी खेळाडू संघात आहेत. बीसीसीआय (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीरने संघात स्टार कल्चर संपवण्याचा निर्धार आधीच केला होता. सूत्रांनी सांगितले की, “गौतम गंभीर  युगाची सुरुवात आता झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन चक्रात भारताला  नवीन चेहऱ्यांची गरज आहे.” संघ व्यवस्थापनाला माहीत होते की, कसोटी प्रकारात वरिष्ठ खेळाडूंच्या (Senior Players) भवितव्याबद्दल गंभीर काय विचार करत आहेत आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे देखील त्यांच्याशी सहमत होते.

भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार  नेहमीच एक मजबूत व्यक्ती राहिला आहे, परंतु गंभीर  यांच्या काळात असे चित्र दिसत नाही. गंभीरने पदभार स्वीकारला तेव्हा रोहित टी२० (T20) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. परंतु, श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी निवड समितीने सूर्यकुमार यादवला  टी२० (T20) संघाची  धुरा सोपवून भविष्यातील इरादे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे, आता भारताला कसोटी  प्रकारात नवीन कर्णधाराची गरज भासणार आहे. रोहितच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत या प्रकारात बुमराह नेतृत्व करत होता, परंतु आता शुभमन गिलला (Shubman Gill) लाल चेंडूच्या संघाचे कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटमधील बदलाच्या या काळात, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि न्यूझीलंड मालिकेतील अपयशाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गंभीरला (Gautam Gambhir) पूर्ण अधिकार  हवे होते, असे समजते. शुभमन गिलच्या रूपाने त्यांच्याकडे एक तरुण कर्णधार (Young Captain) आहे, जो त्यांचे ऐकेल. गिल  एक स्टार खेळाडू आहे, परंतु गंभीरच्या निर्णयांवर आणि रणनीतींवर प्रश्न उपस्थित करण्याइतका त्याचा दर्जा नाही. बुमराह  हा एकमेव खेळाडू त्या उंचीचा आहे, परंतु त्याच्या फिटनेसच्या (Fitness) खराब रिकॉर्डमुळे (Record) त्याचे कर्णधार (बनणे शक्य दिसत नाही. अशा परिस्थितीत, गंभीरकडे पूर्ण अधिकार  असतील, परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांना सांभाळून काम करावे लागेल, ज्यात रोहित आणि विराटची नजर २०२७ च्या विश्वचषकावर (World Cup 2027) असेल.

Title : Gautam Gambhir’s Influence Grows In New Test Era

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now