नवी दिल्ली | प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मध्ये 6 डिसेंबर रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स यांच्यात झालेला सामना वादांनी भरलेला होता. या सामन्यादरम्यान गुजरात संघाकडून खेळणारा गौतम गंभीर आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं होतं. पुढे हा वाद सोशल मीडियावरही पोहोचला. श्रीसंतने एकामागून एक अनेक व्हिडिओ शेअर करत गंभीरवर निशाणा साधला होता.
कुणावर आणि का होणार कारवाई?
श्रीशांतने LLCच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी लीगच्या आयुक्तांकडून एस. श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. करारातील अटींचे उल्लंघन केल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. श्रीशांतने गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) टीका करणारा व्हिडिओ हटवला तरच त्याच्याशी संवाद साधला जाईल, असं या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार, एलएलसीने श्रीशांतवर कारवाई करण्याचीही तयारी सुरु आहे. लीगचे सहसंस्थापक आणि सीईओ रमण रहेजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रमण रहेजा यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, “आम्ही आधीच खेळाडूंच्या करार जबाबदाऱ्या आणि लीगच्या आचारसंहिता धोरणानुसार श्रीसंतवर कारवाई करण्याच्या तयारीत आहोत. घटना घडल्यानंतर 24 तासांतच या गोष्टीला सुरुवात झाली.”
एस. श्रीशांतने त्या सामन्यानंतर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) विरोधात सोशल मीडियावर वक्तव्यं केली होती, जी आचारसंहिता आणि लीजेंड्स लीग क्रिकेटच्या कराराचे उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे. एलएलसीच्या आचारसंहितेनुसार, या लीगमध्ये सहभागी होणारा कोणताही खेळाडू सामना अधिकारी, प्रतिनिधी, कर्मचारी, लीग मालक, फ्रँचायझी सन्मानार्थी किंवा लीगमध्ये सहभागी होणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूवर सार्वजनिकपणे टीका किंवा टिपण्णी करू शकत नाही.
श्रीशांतनं नेमकं काय केलं होतं?
एलएलसीच्या या सामन्यात श्रीशांत आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात वाद पहायला मिळाला होता. मैदानावर दोघे एकमेकांशी भिडले होते. या सामन्यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, मॅचनंतर श्रीशांतने एक व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये त्याने म्हटलं होतं की मॅचदरम्यान गौतम गंभीरची वागणूक चांगली नव्हती. नंतर श्रीसंतने आणखी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, गौती त्याला सामन्यादरम्यान फिक्सर-फिक्सर म्हणत होता. या सामन्यात गौतम गंभीर इंडिया कॅपिटल्सचा तर पार्थिव पटेल गुजरात जायंट्सचा कर्णधार होता.
News Title: gautam gambhir and s sreesanth controversy
महत्त्वाच्या बातम्या-
INDvSA | दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेपूर्वी मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
Fennel Seeds | जेवणानंतर बडीशेफ खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात?, जाणून थक्क व्हाल
Sharad Pawar | मोठी बातमी! ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ
बेड(Bed)वर चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी, महिलांना अजिबात आवडत नाहीत!
Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, घटनास्थळी नेमकं काय घडलं?






