“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”

On: February 5, 2024 12:44 AM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat  Gaikwad) यांनी गेल्या काही दिवसांआधी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. यावर आता वेगवेगळ्या पातळीवरून प्रतिक्रिया येत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गणपत गायकवाड यांना पक्षातून का काढले नाही?, असा सवाल केला आहे.

राज्यातील राजकरण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. अशातच महाराष्ट्राचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले आहेत. भाजपला जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असती तर त्यांना पक्षातून बाहेर काढलं असतं असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. यावेळी बोलत असताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

“हेच का तुमचे रामराज्य?”

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) या भाजपच्या आमदाराने केलेल्या गोळीबार प्रकरणावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. देशात रामराज्य आलं असल्याचं अनेक नेते मंडळी सांगत आहेत. हेच का तुमचं राजमराज्य? आम्ही महेश गायकवाडला धुतल्या तांदळासारखं म्हणत नाही पण आम्ही याचा विरोध करतो, असा मिश्किल टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

भुजबळ टार्गेट

गेल्या काही दिवसांपासून भुजबळांवर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी सांगितलं होतं. नगरच्या सभेमध्ये भुजबळांनी मी राजीनामा आधीच दिला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी भुजबळांवर टीकेची तोफ डागली आहे. भुजबळ हे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी नाभिक समाजाविषयी केलेलं वक्तव्य समाजामध्ये भांडण लावण्यासारखं आहे.

“तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो”

भुजबळ यांनी काल सभेमध्ये राजीनामा दिल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर दानवे म्हणाले की, “मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये हे सरकार तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो ही भूमिका बाळगत आहे,’ अशी मिश्किल टिप्पणी केली.

“संताजी आणि धनाजीसारखा धसका”

सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यावर अंबादास दानवे यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांचे जे दौरे सुरू आहेत. त्या दौऱ्याचा परिणाम हा सरकारवर होत आहे. संताजी आणि धनाजी सारखा धसका त्यांना लागला आहे”, असं दानवे म्हणाले आहेत.

News Title – Ganpat gaikwad On Ambadas danve

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now