अरे व्हा! आता फुकटात आधारकार्ड अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रोसेस

On: April 22, 2024 12:00 PM
Aadhaar Card
---Advertisement---

Aadhar Card l आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा देखील आहे. यासोबतच खाते उघडण्यापासून ते जमीन आणि घर खरेदीपर्यंत सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर आवश्यक आहे. मात्र तुमच्या आधार कार्डचे तपशील अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशातच आता UIDAI मोफत माहिती अपडेट करण्याची सुविधा देत आहे.

‘या’ तारखेपर्यंत करा मोफत आधारकार्ड अपडेट :

UIDAI ने 10 वर्षांपूर्वी केलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत देखील पुन्हा वाढवण्यात आली आहे. गेल्या मार्चमध्ये ही सेवा मोफत वापरण्याची अंतिम तारीख 14 मार्च ते 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही माहिती अपडेट करायची असल्यास तुम्ही कोणतेही शुल्क न भरता ते करू शकता.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या या मुदतीनंतर हे महत्त्वाचे काम करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त My Aadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. या सेवेची मुदत वाढवताना यूआयडीएआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या आधारमध्ये कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

Aadhar Card l अशाप्रकारे करा आधारकार्ड अपडेट :

– सर्वात प्रथम आधारकार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

– त्यानंतर My Aadhaar Portal वर क्लीक करा.

– त्यानंतर जो मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला आहे त्यावर आलेला ओटीपी टाकून लॉगीन करा.

– पुढे तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती वाचून OK बटणावर क्लीक करा.

– मात्र जर तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असल्यास तिथे ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन डॉक्यूमेट्स या पर्यायावर क्लीक करा.

– त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट अपलोड केल्यावर तुमच्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करू शकता.

-सर्वात महत्वाचं म्हणजे हि माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत.

– ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसआरएन नंबर जनरेट होईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही अपडेट केलेली माहिती पुन्हा ऑनलाईन ट्रॅक करू शकता.

News Title- Free Online Aadhar Card Upadtes

महत्त्वाच्या बातम्या- 

“ठाकरे सरकार भाजपच्या 4 बड्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार होतं”, नव्या दाव्याने खळबळ

…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now