माजी पंतप्रधानांच्या नातीचे ११ अफेअर्स, स्वत:च केला मोठा खुलासा

On: July 19, 2025 2:27 PM
Manisha Koiral
---Advertisement---

Entertainment News | राजकीय घराण्याशी संबंधित असूनही, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री मनीषा कोईराला हिने आपल्या ११ श्रीमंत सेलिब्रिटींसोबतच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीही ती एकटीच आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री मनीषा कोईराची प्रेमकहाणी

बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करून अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या मनीषाला अनेक फिल्मफेअरसह इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचे आजोबा बिश्वेशवर प्रसाद नेपाळचे माजी पंतप्रधान होते, तर वडील प्रकाश कोईराला नेपाळमधील प्रसिद्ध नेते होते. पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असतानाही अभिनेत्री ५४ व्या वर्षी एकटीच आयुष्य का जगते आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मनीषा कोईरालाने तिच्या अफेअरबद्दल देखील सर्वकाही सांगितले आहे. तिने अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत सेलिब्रिटींना डेट केले आहे. तिच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीमध्ये अभिनेते नाना पाटेकर आणि विवेक मुशरान यांची देखील नावे होती. नाना पाटेकर यांच्यासोबत मनीषा हिच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

Entertainment News | ११ जणांसोबत अफेअरच्या चर्चा

दोघांमध्ये तब्बल २० वर्षांचा फरक होता. नाना पाटेकर यांचे लग्न झालेले असताना त्यांनी मनीषाला डेट केले होते. असे म्हणतात की, एकदा मनीषाने नाना यांना अभिनेत्री आयेशा हिच्यासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कधीच एकमेकांसोबत दिसले नाहीत, आणि त्यांचे नाते संपुष्टात आल्याची माहिती आहे.

११ जणांसोबत प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अभिनेत्रीने नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केले. परंतु, अभिनेत्रीचे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि त्यांना घटस्फोटाचा सामना करावा लागला. घटस्फोटानंतर मनीषा कोईराला म्हणाली, ‘लग्नानंतर माझा नवराच माझा सर्वात मोठा शत्रू झाला. मी घाईत निर्णय घेतला… लग्न मलाच करायचं होतं… पण नंतर मला कळलं माझा जन्म यासाठी झालेला नाही… चूक फक्त माझी होती…’ अशा शब्दांत तिने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अनुभव व्यक्त केला.

आता मनीषा बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ती आजही तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

News Title-  Former PM’s Granddaughter’s Unfinished Love Story with 11 Wealthy Celebrities

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now