मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला १ वर्षाची कारावासाची शिक्षा, ‘हे’ प्रकरण भोवलं

On: August 7, 2025 9:28 AM
Harshvardhan Jadhav
---Advertisement---

Harshvardhan Jadhav | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई २०१४ मध्ये घडलेल्या घटनेवर आधारित असून, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.

घटनेच्या वेळी हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे जावई आहेत. हा प्रकार ६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर येथील हॉटेल प्राइडमध्ये घडला होता, जिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती. (Harshvardhan Jadhav)

उद्धव ठाकरे यांची बैठक आणि पोलिसांशी झटापट :

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी बंदोबस्त असलेल्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना रोखले. यानंतर जाधव आणि पराग जाधव यांच्यात वाद झाला आणि हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावर धक्काबुक्की व कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Harshvardhan Jadhav | यापूर्वीही पोलिसांवर हल्ला; २०११ मधील प्रकरणही डोळ्यासमोर :

ही पहिली वेळ नाही की हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप झाला आहे. ५ जानेवारी २०११ रोजी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर भेटीदरम्यान, वेरूळ लेणी परिसरात शासकीय बैठकीच्या ठिकाणी पोलिसांशी झटापट झाली होती.

त्यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करून हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातही त्यांना एक वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. औरंगाबाद खंडपीठाने त्यांना नंतर ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. (Harshvardhan Jadhav)

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांना दोनदा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन्ही प्रकरणांत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्याने कायदेशीर दृष्टीने त्यांचा पुढील प्रवास कठीण होण्याची शक्यता आहे.

News Title: Former MLA Harshvardhan Jadhav Sentenced to 1-Year Jail for Obstruction of Government Work

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now