माजी मुख्यमंत्र्यांचं निधन; ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: August 4, 2025 11:57 AM
Shibu Soren Death
---Advertisement---

Shibu Soren Death | झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे (झामुमो) संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराशी झुंज देत त्यांनी सोमवारी सकाळी ८:५६ वाजता शेवटचा श्वास घेतला. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करत त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत लिहिले, “आदरणीय दिशोम गुरुजी आता आपल्यात राहिले नाहीत… आज मी पूर्णपणे शून्य झालो आहे…” (Shibu Soren Death)

एका युगाचा अंत: झारखंडच्या निर्मितीत शिबू सोरेन यांचे मोलाचे योगदान :

शिबू सोरेन यांनी झारखंडच्या निर्मितीसाठी मोठा लढा दिला. आदिवासी हक्कांसाठी सुरू असलेल्या चळवळीतील ते एक प्रमुख चेहरा होते. त्यांनी झारखंड मुक्ति मोर्चाचे नेतृत्व तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ सांभाळले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा संघर्ष, चढउतार अनुभवले.

शिबू सोरेन यांनी तीन वेळा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. पहिल्यांदा २ मार्च २००५ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; मात्र १० दिवसातच बहुमत सिद्ध न झाल्याने राजीनामा दिला. दुसऱ्यांदा २७ ऑगस्ट २००८ ते १९ जानेवारी २००९ आणि तिसऱ्यांदा ३० डिसेंबर २००९ ते १ जून २०१० पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. (Shibu Soren Death)

Shibu Soren Death | रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन :

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना किडनीच्या समस्येमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना स्ट्रोक आला आणि ते ICUमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टिमवर होते. डॉक्टरांच्या विशेष टीमकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होतं, मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

शिबू सोरेन यांच्या निधनामुळे संपूर्ण झारखंडमध्ये शोकाची लाट पसरली आहे. अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची आठवण देशवासीयांच्या मनात सदैव राहील.

News Title: Former Jharkhand CM Shibu Soren Passes Away at 81 After Prolonged Illness

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now