Flora Saini | बॉलिवूड अभिनेत्री फ्लॉरा सैनी (Flora Saini) हिने तिच्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव शेअर करत एका प्रसिद्ध निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनी बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती.
2018 मध्ये ‘#MeToo’ मोहिमेदरम्यान तिने निर्माता गौरांग दोषी (Gaurang Doshi) याने तिला अमानुषरीत्या मारहाण केल्याचा खुलासा केला होता. या घटनेची माहिती मिळताच ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्मात्यासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.
फ्लॉरा सैनीवर निर्मात्याकडून अमानुष छळ
फ्लॉरा सैनीने एका मुलाखतीत सांगितले की, “त्याने माझा जबडा फोडला, मला बेदम मारहाण केली आणि माझ्या प्रायव्हेट पार्टवर देखील हल्ला केला. त्यानंतर त्याने माझा फोनही हिसकावून घेतला.” या भयानक प्रसंगानंतर तिने त्या घरातून पळ काढला आणि पुन्हा कधी त्या निर्मात्याचा चेहराही पाहिला नाही.
#MeToo मोहिमेनंतर करिअरला बसला फटका
फ्लॉरा सैनीने जेव्हा आपल्यावर झालेल्या अत्याचारांविषयी उघडपणे बोलायला सुरुवात केली, तेव्हा अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्यासोबत काम करणे टाळले. “मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. त्यामुळे मला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. लोकांनी मला वाळीत टाकले, पण ऐश्वर्या रायने मात्र माझी साथ सोडली नाही,” असे फ्लोराने सांगितले.
फ्लोराच्या या धक्कादायक अनुभवाची माहिती मिळताच ऐश्वर्या रायने देखील मोठा निर्णय घेतला होता. “तिने त्या निर्मात्यासोबत साइन केलेला चित्रपट त्वरित सोडला आणि अशा व्यक्तीसोबत कोणतेही काम करणार नाही,” असे स्पष्ट केले होते.
Title : Flora Saini reveals shocking experience






