आधी बाप आणि नंतर लेक! आर्यन खान ‘या’ कारणामुळं होतोय ट्रोल

On: February 1, 2023 4:11 PM
---Advertisement---

मुंबई| बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) त्याच्या ‘पठाण'(Pathaan) या चित्रपटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामुळं नेटकरी कमेंट्स करत शाहरूखला चांगलंच सुनावत आहेत.

शाहरूख ट्रोल होत असतानाच त्याचा लाडका लेक आर्यन खानंही(Aryan Khan) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. आर्यन खानचं कृत्य पाहून नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत.

तर झालं असं की आर्यननं नुकतीच एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी हुमा कुरेशी, राधिका आपटे, जावेद अख्तर यांसारखे बडे कलाकारही हजर होते.

यावेळी या सर्व बड्या कलाकारांनी मीडियाला पोज देत फोटो काढून दिले. परंतु आर्यन खान मात्र मीडियाला टाळले आणि कोणालाही काही न बोलता गाडीत जाऊन बसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्यनचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. आर्यनला खूप गर्व आहे, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. सध्या आर्यनचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर त्याच्या विषयी जोरदार चर्चा रंगल्या आहेत

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now