‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयातील ‘तो’ फोटो पाहून चाहते हळहळले

On: January 6, 2026 7:38 PM
khanzadi firoza khan
---Advertisement---

Firoza Khan health update | सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आणि रॅपर खानजादी उर्फ फिरोजा खान सध्या रुग्णालयात दाखल झाली आहे. तिचे हॉस्पिटलमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

नेहमी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणारी खानजादी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे नेमकं काय घडलं, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. स्वतः फिरोजा खानने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत संकेत दिले आहेत. (Firoza Khan health update)

हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर, चाहत्यांना धक्का :

खानजादीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला आयव्ही ड्रिप लावलेली स्पष्टपणे दिसत आहे. चेहऱ्यावर हसू असले तरी तिची अवस्था पाहून चाहते हादरले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओसोबत तिने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही.

मात्र, “माझ्यासोबत नेमकं काय घडलं, हे मी लवकरच सांगणार आहे” असा संकेत तिने दिल्यामुळे तिच्या प्रकृतीबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. कमेंट्समध्ये चाहते तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असून लवकर बरी होण्याच्या शुभेच्छा देत आहेत.

Firoza Khan health update | आधीही गंभीर आजाराशी झुंज :

ही पहिली वेळ नाही की खानजादीला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं आहे. बिग बॉस 17 मध्ये असतानाच तिने Ankylosing Spondylitis या गंभीर आजाराबाबत खुलासा केला होता. या आजारामुळे तिला तब्बल तीन वर्ष व्हीलचेअरवर राहावे लागले होते. त्या काळात तिचं आयुष्य अत्यंत कठीण होतं, असं तिने स्वतः सांगितलं होतं.

या आजारामुळे तिला सतत वेदना, हालचालींवर मर्यादा आणि मानसिक तणाव सहन करावा लागला होता. त्यामुळे तिच्या सध्याच्या हॉस्पिटलायझेशनमागे हाच आजार कारणीभूत आहे का, अशी शक्यता चाहते व्यक्त करत आहेत.

लवकरच करणार खुलासा :

खानजादीने संकेत दिल्यानुसार ती लवकरच सोशल मीडियावर एक व्ह्लॉग किंवा पोस्टद्वारे संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत असल्याची माहिती मिळत आहे. (Firoza Khan health update)

बिग बॉस 17 मध्ये खानजादीची अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांच्यासोबत चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही तिच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

News Title : Bigg Boss 17 Fame Khanzaadi Hospitalised: Actress Firoza Khan Shares Shocking Hospital Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now