Rule Change August 2025 | नवीन महिना म्हणजे नव्या नियमांची सुरुवात! 1 ऑगस्टपासून UPI व्यवहार, बँकिंग सेवा, LPG दर, SBI क्रेडिट कार्ड सुविधा, FASTag पास यामध्ये अनेक बदल झाले आहेत. हे बदल सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर आणि जीवनशैलीवर थेट परिणाम घडवणारे ठरणार आहेत.
या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल म्हणजे UPI वापराच्या वेळा आणि मर्यादा, SBI को-ब्रँडेड कार्डवरील विमा सुविधा बंद, FASTag साठी नवीन वार्षिक पास, LPG दरातील बदल, तसेच PNB केवायसीची अंतिम तारीख यांचा समावेश आहे. त्यासोबतच आता ऑटोपेमेंट व्यवहार नॉन-पीक अवरमध्येच होतील, आणि प्रत्येक यशस्वी व्यवहारानंतर बॅलन्स अपडेट नोटिफिकेशन मिळणार आहे. (Rule Change August 2025)
UPI, क्रेडिट कार्ड, LPG दरात बदल; खर्च वाढणार? :
1 ऑगस्टपासून UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल झाला असून, दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासण्याची परवानगी असेल. पीक अवर्स (10 AM ते 1 PM आणि 5 PM ते 9:30 PM) मध्ये बॅलन्स तपासणं प्रतिबंधित किंवा मर्यादित असेल. दुसरीकडे, प्रत्येक यशस्वी व्यवहारानंतर बँककडून बॅलन्सचा SMS किंवा इन-ॲप नोटिफिकेशन मिळणार आहे.
SBI नेही आपल्या अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील हवाई अपघात विमा सुविधा बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या विमा कव्हरवर परिणाम होणार आहे. तसेच LPG दरामध्ये बदल करत व्यावसायिक सिलिंडरचे दर 33.50 रुपयांनी कमी झाले आहेत, मात्र घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Rule Change August 2025 | FASTag पास, PNB KYC आणि ऑटोपेमेंट व्यवहारातही नवे नियम :
FASTag वापरणाऱ्यांसाठी 15 ऑगस्टपासून नवीन वार्षिक पास ₹3000 मध्ये उपलब्ध होणार आहे, जो एक वर्ष किंवा 200 टोल व्यवहारांपर्यंत वैध असेल. ही योजना अनिवार्य नाही, मात्र महामार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. (Rule Change August 2025)
PNB बँकेने आपल्या ग्राहकांना 8 ऑगस्ट 2025 आधी केवायसी अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. ज्या खातेदारांची KYC माहिती 30 जून 2025 पर्यंत अपडेट केलेली नाही, त्यांना ही अंतिम संधी देण्यात आली आहे. केवायसी अपडेट न झाल्यास खाते गोठवले जाऊ शकते.
ऑटोपेमेंटसाठी नवे वेळापत्रक, व्यवहार ट्रॅकिंगमध्ये मर्यादा :
नेटफ्लिक्स, EMI, SIP सारख्या ऑटोपेमेंट व्यवहार आता गर्दी नसलेल्या वेळेतच (10 AM पूर्वी, 1 ते 5 PM, आणि रात्री 9:30 नंतर) पार पडतील. यामुळे पीक अवर्समध्ये बँक सर्व्हरवरील भार कमी होईल.
जर एखादा व्यवहार अयशस्वी झाला किंवा प्रलंबित राहिला, तर त्याची स्थिती तपासण्यासाठी कमीतकमी 90 सेकंद वाट बघावी लागेल. दिवसातून फक्त 3 वेळा स्टेटस तपासण्याची मर्यादा असून, दोन चेकिंगमध्ये किमान 45-60 सेकंदांचा अंतर असणार आहे.






