अखेर पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले …

On: January 28, 2023 6:04 PM
---Advertisement---

मुंबई | हल्ली महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशातच 2019 ला पार पडलेल्या पहाटेच्या शपथविधीमागं नेमकं कोण होतं याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळं वादंग निर्माण झाला होता.

अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील पवारांवर काही आरोप केले. यानंतर राज्यात तर्क-वितर्काना उधाण आलं होतं. 2019 ला पहाटे शिवसेेनेसोबत युती तोडत सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पहाटे राजभवनात शपथ घेतली होती.

आता मात्र खुद्द पवारांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापुरात दाखल झाले होते. पहाटेचा शपथविधी तुमच्यामुळे झाला असं म्हणलं जात आहे, त्याबदद्ल तुमचं मत काय? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. यावेळी पवारांनी यावर भाष्य करायचं टाळलं आहे.

त्या गोष्टीला आता दोन वर्ष झाली आहेत. तो विषय आता कशाला पुन्हा काढताय? त्यावर चर्चा करुन आता काय होणार आहे? असं म्हणत पवारांनी या प्रश्नाला टाळायचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. त्यामुळं या शपथविधीमागं त्यांचीच खेळी होती का? हे मात्र समजलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now