नाशिक | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आले असून ओझर विमातळावरून दिंडोरीकडे जात असताना कळवण (Kalwan) दिंडोरी रोडवर त्यांचा ताफा अडवण्यात आला. दिंडोरी मार्गाने वणीच्या दिशेने चालले असताना शेतकरी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो कांदे फेकत अजित पवारांचं लक्ष वेधलं. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.
कांदा निर्यात शुल्क मागे, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी (Farmer) विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे.
दरम्यान,पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांचा ताफा सप्तशृंग गडाकडे रवाना झाला.
महत्त्वाच्या बातम्या-






