शेतकऱ्याचं नशीब फळफळलं; झाडाने शिंदे कुटुंबाला केलं करोडपती

On: April 11, 2025 2:19 PM
Keshav Shinde
---Advertisement---

Farmer  | यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या खुर्शी गावातील केशव शिंदे (Keshav Shinde) या शेतकऱ्याचं नशीब एका झाडामुळे अचानक फळफळलं. त्यांच्याच वडिलोपार्जित जमिनीतील एक झाड, ज्याचं महत्त्व शिंदे कुटुंबाला अनेक वर्षं माहीतच नव्हतं, त्याच झाडाचं मूल्य ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या झाडामुळे शेतकऱ्याला न्यायालयीन लढाईनंतर अखेर ५० लाख रुपये मिळाले आहेत.

शिंदे यांच्या ७ एकर शेतीत उभं असलेलं हे डेरेदार झाड २०१३-१४ च्या दरम्यान कर्नाटकातून आलेल्या काही लोकांच्या निदर्शनास आलं. रेल्वे विभागाने (Railway Department) वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादन करत असताना या झाडाकडे लक्ष वेधलं गेलं. त्यांनी हे झाड ‘रक्तचंदन’ (Red Sandalwood) प्रजातीचं असल्याचं सांगितलं. झाडाचं इतकं मोठं आर्थिक मूल्य ऐकून शिंदे कुटुंब चक्रावून गेलं.

झाडाचे ४.९७ कोटींचे मूल्यांकन, कोर्टाचा मोठा आदेश

झाडाच्या मोबदल्याबाबत रेल्वे विभागाने सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर शिंदे कुटुंबाने खासगी संस्थेमार्फत मूल्यांकन करून घेतलं. त्यात झाडाचं मूल्य तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचं स्पष्ट झालं. मात्र ही रक्कम देण्यास टाळाटाळ होताच, शिंदे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court Nagpur Bench) नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

न्यायमूर्ती अविनाश खरोटे (Justice Avinash Gharote) आणि न्यायमूर्ती अभय मंत्री (Justice Abhay Mantri) यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने मध्य रेल्वेला झाडाच्या मोबदल्यात १ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले.

आता त्यापैकी ५० लाख रुपये शिंदे कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यास आणि काढण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय झाडाचे योग्य मूल्यांकन करून उर्वरित रक्कमही शिंदेंना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Title : Farmer Gets ₹50 Lakh for Rare Tree

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now