‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत

On: March 4, 2024 5:37 PM
actor Dharmendra post
---Advertisement---

Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एक काळ गाजवला आहे. अनेक सुपरहीट चित्रपटात काम करत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांवरच छाप सोडली आहे. मात्र, सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा होत आहेत.

नुकतीच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. यामुळे त्यांची प्रकृती ठीक तर आहे ना?, असा सवाल केला जात आहे. त्यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे.

धर्मेंद्र यांची पोस्ट चर्चेत

अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला असून यात ते एका झाडा खाली उभे असलेले दिसत आहेत. यामध्ये ते तरुण दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे एक अभिनेत्रीदेखील दिसत आहेत. मात्र, ती अभिनेत्री कोण आहे? हे स्पष्ट समजले नाही.

हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी ‘अच्छा तो हम चलते हैं’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण त्यांच्या प्रकृतीची विचारणा करत आहेत. त्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत.

धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत

यापूर्वी त्यांनी अशीच एक पोस्ट केली होती. ज्यात ते शिळी भाकरी खाताना दिसत होते. या फोटोत त्यांचे केस विस्कटलेले आणि त्यांच्या पायाला प्लास्टरही दिसून आले. हा फोटो शेअर करत त्यांनी,”अर्धी रात्र झाली…झोप येत नाही..भूकही लागून जाते. मित्रांनो शिळ्या पोळीसोबत लोणी खूपच स्वादीष्ट लागते, हा हा”, असे कॅप्शन दिले. आता त्यांनी पुन्हा एकदा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या फिल्मी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहेत. यापुर्वी त्यांनी ‘तेरी बातो में उलझा जिया’ या चित्रपटात काम केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही ते दिसून आले होते.

News Title-  Fans worried about actor Dharmendra post

महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

Join WhatsApp Group

Join Now