दुखापतीनंतरही रोहित शर्मा मैदानात, पहिला चौकार मारताच चाहते खुश

On: October 29, 2023 2:58 PM
---Advertisement---

लखनौ | लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंडचा वर्ल्डकपचा क्रिकेट सामना सुरु झाला आहे. टीम इंडियाने इकाना येथ याआधी फारसे सामने खेळले नाही. शेवटच्या वेळी या मैदानात सामना झाला होता तेव्हा त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतक झळकावलं होतं.

इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथ म फलंदाजी करताना किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या टीम इंडीयाचा कर्णधार रोहित शर्माने बॅटिंगला सुरुवात केल. यानंतर रोहितने सुरुवातीलाच चौकर आणि षटकार मारले. बॅटिंगसाठी सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गील मैदानात उतरले.

सामना होण्यापूर्वी मैदानात सराव करत असताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मनगटावर दुखापत झाली होती. मात्र तरी सुद्धा रोहित शर्मा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

हिटमॅनने आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना पाणी पाजलं आहे. रोहितनं आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मधील 5 सामन्यांत 311 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 133 स्ट्राईक रेट आहे. 

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now