मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

On: January 20, 2025 11:17 AM
Famous Marathi actor Yogesh Mahajan passes away 
---Advertisement---

Yogesh Mahajan passes away | मराठी मनोरंजन विश्वातून (Marathi Entertainment Industry) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे. हॉटेलच्या खोलीत (Hotel Room) ते मृतावस्थेत (Dead) आढळून आले. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. (Yogesh Mahajan passes away)

वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिनेते योगेश महाजन हे शनिवारी शूटिंग करत होते.

शनिवारी (Saturday) होते शूटिंगवर (Shooting)

शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती अस्वस्थ (Unwell) झाली होती. सेटवरून (Set) त्यांना डॉक्टरांकडे (Doctor) नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना औषधे (Medicines) दिली आणि ते रात्री हॉटेलच्या खोलीत जाऊन झोपले.

झोपेतच (Sleep) काळाचा घाला

रात्री झोपलेले योगेश सकाळी उठलेच नाहीत. सकाळी शूटिंगसाठी ते सेटवर न पोहोचल्याने टीमने (Team) त्यांना अनेकदा फोन (Phone Calls) केले. पण, त्यांनी एकाही फोनला उत्तर दिले नाही. त्यामुळे टीमला संशय आला आणि त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या खोलीकडे धाव घेतली. (Yogesh Mahajan passes away)

खोलीत योगेश मृतावस्थेत आढळून आले. रात्री झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या घटनेमुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा (Grief) पसरली आहे. अनेक कलाकारांनी (Artists) सोशल मीडियाद्वारे (Social Media) योगेश महाजन यांना श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे.

Title : Famous Marathi actor Yogesh Mahajan passes away  

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now