फडणवीसांनी काढली निलेश राणेंची समजूत; राजीनाम्याचा निर्णय मागे

On: October 25, 2023 2:22 PM
---Advertisement---

मुंबई | भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर निलेश राणेंनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे. निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही त्यांची समजूत घातली. पण निलेश राणे (Nilesh Rane) आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांना सागरवर बोलावलं. या दोघांशीही चर्चा केली. तसेच निलेश राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे निलेश राणे यांनीही आपला राजीनामा मागे घेत पक्षात सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असं चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now