Nails Eating Habits | …म्हणून लोक नखं खातात; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

On: January 21, 2024 4:15 PM
Nails Eating Habits
---Advertisement---

Nails Eating Habits | तुमच्या आजुबाजूला असे बरेच लोक असतील ज्यांना सतत नखं खाण्याची (Nails Eating Habits) घाणेरडी सवय असते आणि यामध्ये कदाचित तुमच्या स्वत:चाही समावेश असू शकतो. नखं आपल्या हातांचं सौंदर्य वाढवतात पण अनेकांना ती खायची सवय असते. यामुळे हात केवळ कुरूपच दिसत नाहीत तर ते आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. हो, नखे चावणे ही सामान्य वाटणारी गोष्ट अनेकांना शुल्लक वाटते. पण यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

…म्हणून लोक नखं खातात

जाणून घेऊया की काही लोकांना ही वाईट सवय का जडते आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी कोणता चांगला मार्ग आहे?. पण लोक नखं का खातात (Nails Eating Habits) याबाबत तज्ञ्जांनी महत्त्वाचं कारण सांगितलंय.

तज्ञ म्हणतात की परफेक्शनिझम हे नखे खाण्याच्या सवयीशी जोडलेले आहे, कारण यामुळे तणाव आणि चिंता निर्माण होते. परफेक्शनिज्म असलेले लोक इतर लोकांपेक्षा त्यांची नखे जास्त खातात. लोकांना कोणत्याही गोष्टीचा ताण लगेच जाणवू लागतो. तज्ञांच्या मते, हे नखं चावण्याचं कारण देखील बनू शकतं. लहान वयातच मुलं हे करायला लागतात आणि मग ते मोठे होईपर्यंत त्यांना ही सवय लागते.

फ्रस्टेशन किंवा अशा एखाद्या स्थिती असाल जे हाताळू शकत नाही, ते लोक कधी कधी नखे चावतात. जर्नल ऑफ बिहेवियर थेरपी आणि प्रायोगिक मानसोपचार मधील अभ्यासानुसार, निराशा ही एक फिलिंग आहे, ज्यामुळे नखं चावणं होऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये, तीव्र नखं चावणं हे OCD चे लक्षण असू शकतं. इतकंच नाही तर कधी-कधी हे एडीएचडी, वेगळेपणाची चिंता, टॉरेट्स सिंड्रोम, नैराश्य आणि मानसिक विकारांशी संबंधित आहे.

Nails Eating Habits | नखे खाणं बंद करण्यासाठी करा हे उपाय

ग्लोज घालणं हा एक तात्पुरता उपाय आहे. आपण सुती कापडाचे हातमोजे घालू शकता जेणेकरून ग्लोज हातात असताना हात तोडांजवळ जाणार नाहीत. तसेच होमिओपॅथिमध्ये अशी औषधे आहेत जी नखं चावणं आणि हात तोडांत घालणं या वाईट सवयींपासून रोखते आणि मनावर सकारात्मक परिणाम करते.

स्वत:च्या मनाला सतत पटवून द्या की ही सवय वाईट आहे आणि ती मला लवकरात लवकर सोडायची आहे. आपण चारचौघात नखं खात आहोत हे लक्षात येताच लगेच स्वत:ला थांबवा

महत्त्वाच्या बातम्या- 

Shoaib Malik च्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया देत सानिया मिर्झाने केला मोठा गौप्यस्फोट!

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना म्हणाले ‘मूर्ख’; ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

Ram Mandir | 22 जानेवारीला काय बंद काय चालू?; वाचा एका क्लिकवर

Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now