‘ती आयडिया शरद पवारांचीच होती’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

On: October 4, 2023 3:29 PM
Sharad Pawar
---Advertisement---

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉन्क्लेव्हसाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार (Sharad Pawar) यांचीच होती. 2019 मध्ये शिवसेनेनं आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं कानावर आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्यानं आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला होता, असं फडणवीसांनी सांगितलं.

तुम्हाला मूड ऑफ नेशनमध्ये मूड ऑफ महाराष्ट्र समजत नाहीये, महाराष्ट्रात मोदींबद्दल प्रेम आहे. राष्ट्राच्या मूडमध्ये महाराष्ट्राचा मूड समजू शकत नाही. महाराष्ट्रात मोदींबद्दल प्रेम आहे. त्यामुळेच आपण ही भावना पकडू शकत नाही. आम्ही महाराष्ट्रात 48 पैकी 49 जिंकू शकत नाही. त्यामुळेच आम्ही 40 हून अधिक जागा जिंकू, असा दावा फडणवीसांनी केलाय.

अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं. आमचं दिल्लीला जाणं आधीच ठरलं होतं. आम्ही दिल्लीला गेलो. आम्ही अशा फेडरेशनमध्ये काम करतो की, राज्य सरकारला केंद्र सरकारशी समन्वय ठेवावा लागतो, त्यामुळे त्यात काहीच अडचण नाही, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now