ठाकरे कुटुंबातील व्यक्तीबाबत शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक दावा!

On: August 11, 2023 1:42 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Mla Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोव्हिड घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतल्याचं सुजित पाटकरांनी सांगितलं. यावर बोलताना शिरसाट यांनी खळबळनक वक्तव्य केलं.

उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणालेत.

कोण तुरुंगात जाणार असं शिरसाट यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी थेट नावच घेऊन खळबळ उडवून दिली. यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल अनिल परब असेल ठाकरे कुटुंबातील कोणी असेल ते आत जाणारच ना?, असा दावा शिरसाट यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now