‘मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते’; ईशा देओलचा मोठा खुलासा

On: February 9, 2024 12:47 PM
Esha Deol
---Advertisement---

Esha Deol | बॉलिवूड अभिनेत्री आणि देओल कुटुंबातील मुलगी ईशा देओलने (Esha Deol) पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याचा खुलासा केल्यापासून तिच्या जुन्या मुलाखती चर्चेत आल्या आहेत. खरं तर ईशा देओलने याआधीही एकदा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. सासरच्या वातावरणाबद्दल बोलताना ईशा म्हणाली होती की, भरत तख्तानीसोबत लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते.

ईशा देओलने तिच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तकही लॉन्च केले होते. तिने तिच्या ‘अम्मा मिया’ या पुस्तकात जीवनातील अनुभव सांगितले आहेत. लग्नानंतर तिच्या आयुष्याला कसे नवे वळण लागले तेही तिने पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहे. 2020 मध्ये ईशाने तिचे ‘अम्मा मिया’ हे पुस्तक लाँच केले.

ईशा देओलचे विधान चर्चेत

पुस्तकात तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा आम्ही दोघांनी 2012 मध्ये लग्न केले तेव्हा अचानक माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मी घरात शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून फिरू शकत नव्हते. जशी मी लग्नाआधी घरात राहायचे तसे मला लग्नानंतर घरात वावरता येत नव्हते.

दरम्यान, ईशाने भरत तख्तानी कुटुंबाविषयी लिहिले होते की, तिला सासरच्या घरी खूप चांगले वागवले जात होते. तिथे सर्व महिला आपापल्या नवऱ्याच्या जेवणासाठी घरगुती जेवणाचे डबे तयार करत असत. पण ईशावर तिच्या सासू-सासऱ्यांकडून असा कधीच दबाव आणला नाही.

Esha Deol चा घटस्फोट

तसेच माझ्या सासरच्या घरात मला तिसऱ्या मुलीप्रमाणे वागवले जायचे. माझ्यावर स्वयंपाकघरात काम करण्याची सक्ती कधीच केली नाही, जशी सामान्य सूनेला तिच्या सासरच्या घरी करायला लागते त्या कामापासून मी नेहमी लांब होते. माझ्या सासूबाईही मला सांगायच्या की, तू भरत आणि त्याच्या भावानंतर माझे तिसरे मुल आहेस.

ईशा देओलने तिच्या सासऱ्यांबद्दल सांगितले की, मी घरातील मोठी सून आहे, त्यामुळे मला खूप प्रेम मिळाले. प्रत्येकजण माझ्यासाठी फळे, चॉकलेट ब्राउनी आणि आईस्क्रीम आणायचे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 2012 मध्ये लग्नापूर्वी काही दिवस दोघांनी एकमेकांना डेट केले होते. या जोडप्याने काही दिवसांपूर्वी एक संयुक्त निवेदन जारी करून वेगळे होण्याची घोषणा केली.

News Title- Esha Deol and Bharat Takhtani got divorced
महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्राचा बिहार झालाय”, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची हत्या; राजकारण तापलं; फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

हल्द्वानी दंगल! मशिदीवर कारवाई अन् हिंसाचाराचा आगडोंब; राज्यात हाय अलर्ट, शहर राहणार बंद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल; टीम इंडियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याची सुवर्णसंधी

सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली

शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

Join WhatsApp Group

Join Now