Esha Deol | अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतला आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचं भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं म्हणत ईशा (Esha Deol) आणि भरत वेगळे झाले.
घटस्फोटानंतर ईशा दोन्ही मुलींचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. अशातच तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. घटस्फोट झाल्यानंतर ईशाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे.
Esha Deol ची पोस्ट चर्चेत
‘आयुष्यात कितीही अंधार आला तरी देखील काही फरत पडत नाही. कारण एक दिवस सूर्याचा प्रकाश पुन्हा संपूर्ण आयुष्य प्रकाशमय करेल…’, अशी पोस्ट ईशाने केली आहे. यासोबतच तिने स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोला चाहते बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.
घटस्फोट झाल्यानंतर ईशा अखेर व्यक्त झालीच, असं चाहते म्हणत आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. घटस्फोट झाल्यानंतर ईशाने भरत बद्दल अनेक खुलासे केले होते.
ईशा (Esha Deol) आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. मात्र दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरतला माझ्याकडून दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायचं, असं तिने पुस्तकात म्हटलं. मी त्याला वेळ देत नसल्याचं त्याला वाटायचं. यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाल्याचं अभिनेत्री सांगते.
View this post on Instagram
एखाद्या पतीला असं वाटणं साहजिक आहे. मी राध्याची शाळा आणि मियाराच्या संगोपनामध्ये अधिक व्यस्त असायची. यावेळी मी माझं पुस्तकही लिहायची. वैयक्तिक आयुष्यासोबतच मला माझ्या कामावरही लक्ष द्यावं लागायचं. माझ्या प्रोडक्शनच्या मिटिंग्सही सुरू होत्या, असं ईशाने पुस्तकात सांगितलंय. ईशाने ‘अम्मा मिया : स्टोरीज, अॅडवाइस अँड रेसिपी’ या तिच्या पुस्तकात दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
ईशा आणि भरतचा घटस्फोट
ईशा (Esha Deol) आणि भरत यांच्या घटस्फोटाची अनेक कारणे देण्यात आली. भरतचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे ईशा त्याच्यापासून वेगळी झाल्याचं म्हटलं गेलं. भरत याला एका मुलीसोबत स्पॉट देखील करण्यात आल्याचा दावा एका सोशल मीडिया युजरने केला होता. यावर दोघांनी अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आता ईशाची ही नवीन सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.
News Title- Esha Deol post goes viral
महत्त्वाच्या बातम्या –
महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे
शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू
पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव
मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण






