ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

On: February 7, 2024 3:00 PM
Esha Deol
---Advertisement---

Esha Deol | अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol Divorce) आणि भरत तख्तानी यांनी वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचं भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मात्र, या जोडप्याच्या संसारात कुणी आग लावली?, याबाबत सोशल मिडियावर चर्चा होत आहेत. अशातच एका युजरने केलेल्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. भरतचे विवाहबाह्य संबंध असल्यानेच ईशाने त्याला घटस्फोट दिल्याचं या युजरने म्हटलं आहे.

भरतचे विवाहबाह्य संबंध?

ईशा देओलने (Esha Deol ) उद्योजक भरत तख्तानी (Bharat Takhtani) सोबत लग्न केल्यानंतर आपले फिल्मी करीअर सोडून दिले. ईशाने लग्नानंतर कुटुंबाला अधिक महत्व दिलं. मात्र तिच्या घटस्फोटाच्या चर्चामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता एका सोशल मिडिया युजरने केलेल्या दाव्याची चर्चा होत आहे.

ईशाचा (Esha Deol )पती भरत न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये गर्लफ्रेंडसोबत दिसून आला. भरतची ही गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहात असल्याचा दावाही या युजरने केला आहे. या पोस्टनंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. भरतच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच ईशा त्याच्यापसून विभक्त झाल्याचं या युजरने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

ईशा आणि भरत यांनी 29 जून 2012 मध्ये इस्कॉन मंदिरात लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. या जोडप्याला एकत्र शेवटी 2023 मध्ये हेमा मालिनी यांच्या वाढदिवशी पाहण्यात आलं. यानंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या.

ईशानेही केले अनेक खुलासे

ईशाने (Esha Deol) ‘अम्मा मिया : स्टोरीज, अॅडवाइस अँड रेसिपी’ या तिच्या पुस्तकातही भरतबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरतला माझ्याकडून दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायचं, असं तिने पुस्तकात म्हटलं आहे. मी त्याला वेळ देत नसल्याचं त्याला वाटायचं. यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाल्याचं अभिनेत्री सांगते. मात्र, या सोशल मिडिया युजरने केलेल्या दाव्याचीही आता चर्चा होत आहे.

News Title-  Esha Deol and Bharat Takhtani divorce reason revealed

महत्त्वाच्या बातम्या –

घटस्फोटानंतर भरत तख्तानीबाबत Esha Deol ने केला मोठा खुलासा!

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

Join WhatsApp Group

Join Now